स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे विशुद्ध दर्शन. आळंदी-देहूतून ज्ञानोबा माऊली व तुकोबारायांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात. या मार्गावरील त्यांचा प्रवास मग केवळ वारकऱ्यांचा राहात नाही, तो सर्वांच्याच मनातून सुरु होतो. याच जाणिवेतून वरिष्ठ पत्रकार, विश्लेषक व संवादक राजेंद्र हुंजे यांनी `कैवल्यवारी` या सांगीतिक वारीची संकल्पना साकारली व रसिकांनी त्यास भरभरुन प्रतिसाद दिला. कैवल्यवारीचे शीर्षकगीत नुकतेच दाखल झाले असून प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांनी ती सादर केली आहे. यानिमित्ताने, सावनी आणि राजेंद्र यांना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी. कैवल्यवारीचा प्रवासच नव्हे तर त्यातून आलेले विलक्षण अनुभव ऐकणं ही देखील श्रोत्यांसाठी पर्वणीच ठरते. `कैवल्यवारी`चा हा असा स्पर्श लाभणं म्हणजे प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्यातला आत्मिक आनंद मिळण्यासारखंच ठरतं...जरुर ऐका आणि इतरांनाही ही कैवल्यवारी अनुभवू द्या!