स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
पंढरीच्या वारी म्हणजे मराठी संस्कृतीचं आगळं वैशिष्ट्यं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी निघते आणि आळंदी-देहू ते पंढरपूर या प्रवासात विविध टप्प्यांवर पोहोचते तेव्हा नेमकं काय होतं, वारकऱ्यांच्या मनात कोणते भाव असतात आणि ते कसे व्यक्त होतात याचं आगळं सांगीतिक दर्शन घडविणारा प्रयोग म्हणजे कैवल्यवारी. यातून महाराष्ट्रातील दिग्गज गायकांनी, कलाकारांनी भक्तीसंगीत नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या संकल्पनेचे शिल्पकार, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आणि कैवल्यवारीच्या गीतकार सौ. वर्षा हुंजे यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून स्टोरीटेलवर श्रोत्यांना कैवल्यवारीचा अनुभव घेता येतो. त्याचीच ही झलक आजच्या कट्ट्यावर. कैवल्यवारीतील अत्यंत श्रवणीय अशी गीते आणि त्यांची संवादातून गुंफण करणारा हा पॉडकास्ट संपूर्ण ऐकण्यासाठी स्टोरीटेलला भेट द्या आणि रममाण व्हा विठुरायाच्या भक्तीरंगांत.
`कैवल्यवारी` स्टोरीटेलवर संपूर्ण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Kaivalya Wari - Audiobook - Santosh Deshpande - Storytel
स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Storytel - Subscriptions