स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
आपली मराठी भाषा किती लोभस, सुंदर! मात्र, मराठीत लिहिताना अनेकदा आपण कळत नकळत चुका करतो. या चुका नेमक्या कोणत्या, मराठी शब्द लिहिताना कोणती काळजी घ्यायला हवी, व्याकरणाच्या गुंतागुंतीत न अडकता मराठीचे साधे, सोपे नियम कोणते आहेत, इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द कोणते आहेत, शहरांची नावे, अंकलेखन करताना काय काळजी घ्यायला हवी? आपणास रोजच्या व्यवहारात पडणाऱ्या या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारे पुस्तक `लिहू या बिनचूक मराठी` नुकतेच दाखल झाले आहे. प्रकाशनाच्या वेळीच पहिली आवृत्ती संपली अशा या पुस्तकाचे लेखक श्रीपाद ब्रह्मे व नेहा लिमये यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून मराठी बिनचूक लिहिण्याची प्रेरणा तर मिळतेच शिवाय, त्यासाठीचे कानमंत्रही मिळतात. जरुर ऐकावा व इतरांनाही आवर्जून ऐकवावा असा हा स्पेशल पॉडकास्ट.