स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड जीवन आपल्या समोर तेजस्वीपणे मांडणाऱ्या बाबासाहेबांंचं आयुष्य नक्की कसं होतं याचा वेध डॉ. सागर देशपांडे यांनी घेतला आणि साकारली 'बेल भंडारा' ही कादंबरी...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे आणि या कादंबरीला आवाज लाभला आहे नचिकेत देवस्थळी यांचा...
तत्पूर्वी, या आठवड्यात, स्टोरीटेलवर येणाऱ्या पुस्तकांबाबत माहिती दिली आहे, प्रसाद मिरासदार यांनी.
बेल भंडारा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2553432-Bel-Bhandara
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans