Sveriges mest populära poddar

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum

155: दैनंदिन 'गीतायोग'!

42 min • 17 april 2021

ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक राजेंद्र खेर यांच्या शब्दांत दररोज सकाळी भगवद्गीता ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय आनंद! स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी 'दैनंदिन भगवद्गीता'च्या माध्यमातून दररोज म्हणजे ३६५ दिवस गीतेतील विविध आध्याय, त्याचे अर्थ व महत्त्व अशा स्वरूपात गीता उपलब्ध केली आहे. गेली अनेक वर्षे गीतेचा अभ्यास असलेले खेर अगदी सोप्या भाषेत ही गीता समजावून सांगतात... हा उपक्रम नक्की काय आहे, गीतेचं महत्त्व त्यांनी कशाप्रकारे समजावून सांगितलं आहे, यावर राजेंद्र खेर व प्रसाद मिरासदार यांनी चर्चा केली आहे. तेव्हा आवर्जून ऐका हा गीतामय कट्टा!

या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.
 
'दैनंदिन भगवद्गीता' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/series/55992-Bhagwatgeeta-Divas

सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

Kategorier
Förekommer på
00:00 -00:00