स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
बरोबर अडोतीस वर्षांपूर्वी म्हणजे ७ ऑगस्ट १९८१ ‘कमला’चा पहिला प्रयोग झाला. आता अडोतीस वर्षांनंतर स्टोरीटेलने विजय तेंडुलकरांचे ‘कमला’ पुन्हा श्राव्य माध्यमात आणले.
एका बातमीने रुजलेल्या ह्या दोन दिवसाच्या कालावधीच्या कथानकात तेंडुलकरांनी करून दिलेली समाजाच्या भिन्न स्तरांची ओळख, त्या जाणिवेची दाहकता आजही त्याच तीव्रतेने जाणवते.
प्रतिक्षा लोणकर, नेहा जोशी, अनुपमा ताकमोगे, अभय जोशी, देवेंद्र दोडके आणि सचिन खेडेकर यांनी ते आपल्या आवाजाच्या जादूने प्रत्यक्षात आणले आणि त्याच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिलया पेलले.
सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमात आलेल्या ह्या कलाकृतीचे आता फक्त श्राव्य माध्यमात साकार करायचे आव्हान ह्या कलाकारांनी कसे स्विकारले आणि त्या निमित्ताने त्यांना झालेल्या एका उत्तम अविष्काराची ओळख ते सांगत आहेत ह्या पॉडकास्टमध्ये!
हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.
‘कमला’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.