स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत आणि वेध लागले आहेत चालू वर्ष सरायचे! त्याला अजून पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर जाणार व त्यानंतर होणार नवीन वर्षाचे आगमन!
तोपर्यंत करायचे काय?
काळजी नको! स्टोरीटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला.
हे वर्ष जन्मशताब्दींचे वर्ष! मग त्यात ग.दि.मा, अण्णा भाऊ साठे, सुधीर फडके, सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे अशी दिग्गज नावं आहेत.
तर पुल जन्मशताब्दीच्या सांगतेला खास पुल आणि सुनीताबाईंची पुस्तकं येत आहेत ऑडिओबुक स्वरुपात रसिकांच्या भेटीला, ते ही दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरे, चिन्मय मांडलेकर आणि इतरांच्या आवाजात!
त्यात ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ची संजय सोनावणी लिखीत ‘पावनखिंड ३०३’ ही नवीकोरी भेट येत आहे. स्टोरीटेलतर्फे मल्टी व्हॉईस आणि संपूर्ण पार्श्वसंगीतासह भव्य दिव्य नाट्यमय स्वरूपात.
त्याबरोबरच गोनिदांचे कृष्णवेध, रूमाली रहस्य... सु.शिं.ची दास्तान आणि काही नवीन शॉर्टस्टोरीजही येत आहेत.
याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या.
त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला!
तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.