स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या ‘अॅडम’चे!
अॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी!
यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अॅड्म आणि इव्ह’ यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा!
रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देताना असलेले आव्हान, कलाकृतीचा आकृतीबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यावर विक्रम भरभरून बोलले आहेत आणि त्यांना बोलते केले आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर यांनी!
तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये.
आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.
‘अॅडम’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.