स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
खरं तर प्रत्येक रसिक असतो एक अव्यक्त साहित्यिक. तो शब्दांना आपल्या आपल्या कवेत घेऊ पाहतो अन् भावनांची गलबते त्या शब्दसागरी विहरत असतात. अशाच रसिक मात्र काहीशा अव्यक्त साहित्यिकांसाठी स्टोरीटेल घेऊन येत आहे खास हक्काचं व्यासपीठ...स्टोरीटेल स्पॉटलाईट. या मालिकेअंतर्गत आपण महाराष्ट्रातील अनेक प्रतिभावंत मात्र फारसे प्रसिद्धीझोतात न आलेल्या साहित्यिक, कवींना संवादाचे व्यासपीठ देत आहोत.
आपल्या आसपासच्या, परिचयातील गुणी, प्रतिभावंतांची नावं आपण यासाठी सूचवू शकता.
या उपक्रमात पहिला पॉडकास्ट सादर करीत आहोत नांदेड येथील सौ. मायाताई संजयराव पार्डीकर यांचा. गृहिणी म्हणून काम करतानाच स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांनी महिलांसाठी मोठं काम उभारलेेलं आहे. हे करीत असताना लहानपणापासून जोपासलेली कवितांची आवड त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळपण अधोरेखित करते. चला ऐकूया त्यांच्याशी रंगलेल्या या छोटेखानी गप्पांची मैफल...
‘स्टोरीटेल स्पॉटलाइट’ मध्ये झळकण्यासाठी लिहा [email protected] या इमेलवर! आपल्यातले काही भाग्यवान येतील या ‘स्पॉटलाईट’ मध्ये!
आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.