आज देशातच नाही तर संपूर्ण जगात वेगवेगळ्या कारणांनी झोपडपट्ट्या शहरी भागामध्ये स्थित झालेल्या आढळतात त्या कमी होण्याऐवजी किंवा निर्मूलन होण्याऐवजी यांच्यात सातत्याने भर पडत असल्याचे दिसून येते. आशिया खंडातील सर्वात जुनी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टी मुंबई शहरात असलेली आढळते. झोपडपट्टी वाढीस विविध कारणे कारणीभूत असल्याचा ऊहापोह प्रस्तुत एपिसोड मध्ये करण्यात आला आहे.