अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास करीत असतो, विपणन,उत्पादन, वितरण आणि विनिमय ह्या चारही घटकांना अनुषंगून ज्या काही क्रिया घडतात त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करीत असते. म्हणजेच मानवाच्या आर्थिक बाबींचा अभ्यास करण्याचे काम अर्थशास्त्र करते आणि या *आर्थिक बाबींचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनावर त्याच्या सामाजिक अंगांवर पडत असतो किंवा सामाजिक बाबींमुळे सुद्धा त्याचा आर्थिक जीवन प्रभावित होत असते* म्हणून त्यांचे आर्थिक प्रश्न, समस्या वा अर्थार्जनाची प्रक्रिया हे आकलन करण्यासाठी अर्थशास्त्राला मानवाच्या सामाजिक जीवन प्रणालीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि हे अध्ययन त्यास समाजशास्त्राच्या सहाय्याने करता येते.समाजशास्त्र हे मानवाच्या सर्वांगीण बाबींचा सामाजिक जीवन प्रणालीचा अभ्यास करीत असतं आणि त्याचे सामाजिक जीवन हे आर्थिक बाबींमुळे सुद्धा प्रभावित होत असते म्हणून एखादी दारिद्र्याची संकल्पना असेल बेरोजगारीची समजून कल्पना असेल उपासमारीची संकल्पना असेल यांचे अध्ययन करायचं असेल तर त्यास आर्थिक अर्थशास्त्र या ज्ञानाचा देखील अभ्यास किंवा आधार घ्यावा लागतो म्हणून हे दोन्ही शास्त्र एखाद्या मानवी जीवनासाठी, मानवी जीवनाच्या अध्ययनासाठी एकमेकास पूरक आहेत, परंतु अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू हा मानवाच्या आर्थिक बाबी हा आहे तर समाजशास्त्राचा केंद्रबिंदू मानवाचा सामाजिक बाबी आहे, म्हणून या दोन्ही शास्त्रांमध्ये भेद असलेला दिसून येतो.