राज्यशास्त्रामध्ये व्यक्तीच्या, समाजाच्या राजकीय बाबींचा, सत्तासंबंधांचा, कायदे व व्यवस्था यांचा अभ्यास केला जातो तर राजकीय व्यवस्था आणि सत्तासंबंध, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय संबंध, यांचा प्रभाव सामाजिक व्यवस्थेवर, समाजजीवनावर पडत असतो, म्हणून समाजव्यवस्थेचा अभ्यास करतांना त्यांची राजकीय बाजू समजून घेणे व राजकीय बाबींचा अभ्यास करताना, समाज जीवन समजून घेणे हे दोन्ही शास्त्रांची परस्परावलंबनाची गरज आहे, म्हणून या दोन्ही शास्त्रांमध्ये समन्वयन दिसून येते, परंतु या दोन्ही शास्त्राचे अभ्यास विषय हे मात्र भिन्न असलेले दिसतात.