समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ही दोन्ही शास्त्रे एकमेकांशी परस्परावलंबी आहेत परंतु ते दोन्ही वेगवेगळी सुद्धा आहेत, समाजशास्त्र मानवाच्या सामाजिक बाबींचा तर मानसशास्त्र हे मानवाच्या मानसिक वर्तनाचा अभ्यास करते, व्यक्तीच्या मानसिकतेला अनेकदा सामाजिक बाबी कारणीभूत ठरतात तर सामाजिक बाबींना मानसिक वर्तन कारणीभूत ठरते याच बाबींची उकल करण्यासाठी या दोन्ही शास्त्रांना, एकमेकांच्या ज्ञानशाखांचा, ज्ञानाचा आधार घ्यावा लागतो म्हणून ही दोन्ही शास्त्रे परस्परावलंबी व भिन्न आहेत.